आरटीओ कार्यालयात 21 जून रोजी वाहन कर न भरलेल्या व विविध गुन्हयात जप्त वाहनांचा होणार ई-लिलाव
- Get link
- X
- Other Apps
आरटीओ कार्यालयात 21 जून रोजी
वाहन कर न भरलेल्या व विविध गुन्हयात
जप्त वाहनांचा होणार ई-लिलाव
वाशिम, दि. 08 (जिमाका) : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्हयांतर्गत जप्त केलेल्या वाहनांचा जाहिर लिलाव ई-लिलाव पध्दतीने 21 जून 2022 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. ई-लिलावातील वाहने पाहणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि पोलीस स्टेशन, वाशिम (शहर) येथील आवारात उपलब्ध असतील. या लिलावात एकूण पाच वाहने उपलब्ध आहेत. यामध्ये बस, ट्रक व ॲटोरिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी वाहन मालकांना राहील. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 10 ते 16 जून 2022 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम येथे 17,500 रुपये रक्कमेचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाशिम यांच्या नावाने अनामत धनाकर्षसह नाव नोंदणी करुन प्रत्यक्ष येऊन पुर्तता करावी. बोलीदारांपैकी जीएसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येईल. विस्तृत माहितीसाठी संबंधित व्यक्तींनी कार्यालयाशी संपर्क करावा. ई-लिलावाचे अटी व नियम 10 जून 2022 पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम तसेच www.eauction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. ही वाहने जशी आहे तशी या तत्वावर जाहिर ई-लिलावाव्दारे विकली जातील. कोणतेही कारण न देता हा जाहिर ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसूली अधिकारी, वाशिम यांच्याकडे राखून ठेवले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment