मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायीक अभ्यासक्रम प्रवेशजात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करा

मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायीक अभ्यासक्रम प्रवेश

जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी
त्वरीत अर्ज सादर करा
वाशिम, दि. 13 (जिमाका) : व्यावसायीक अभ्याक्रमासाठी सन 2022-23 या वर्षात राज्य सामायीक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षीत जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीनुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यत: तीन महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी हा व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्याने अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम येथे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरीत अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष व उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम यांनी केले आहे.  
*******

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे