अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींकरीता निवासी शाळा प्रवेशोत्सवासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे



अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींकरीता निवासी शाळा

 प्रवेशोत्सवासाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे

        वाशिम, दि.२(जिमाका) : जिल्हयातील वाशिम तालुक्यातील सुरकुंडी,मंगरूळपिर तालुक्यातील तुळजापुर आणि रिसोड तालुक्यातील सवड येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींकरिता शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत.या शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार निवास,भोजन,पाठ्यपुस्तके,स्टेशनरी व गणवेश इत्यादी मोफत सुविधा दिल्या जातात.याशिवाय सुसज्ज ग्रंथालय, ई-लायब्ररी, प्रयोगशाळा, मनोरंजन कक्ष, संगणक कक्ष, व्यायामशाळा, इत्यादी सोयी सुविधांचा लाभ प्रवेशित विदयार्थाना दिला जातो. तसेच या निवासी शाळांमध्ये अनुभवी शिक्षक वर्ग असून विविध शिक्षणपुरक उपक्रम राबविले जातात.

           सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २७ जून २०२२ पासून होत आहे. शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सर्व प्रवेशित विदयार्थांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके व स्टेशनरी दिली जाणार आहे. नव्याने प्रवेशित होणाऱ्या विदयार्थांचे स्वागत केले जाणार आहे. प्रवेशोत्सवास जिल्हयातील लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी या प्रवेशोत्सवास विदयार्थी व पालकांनी मोठ्या प्रमाणात स्वतः उपस्थित राहावे.असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे