कारंजा येथे १९ जून रोजी रोजगार मेळावा रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे आवाहन


कारंजा येथे १९ जून रोजी रोजगार मेळावा

रोजगारासाठी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे
 
कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे आवाहन 

वाशिम दि.१५ (जिमाका) जिल्ह्यातील नोकरी/रोजगार इच्छुक उमेदवारांना तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात.या उद्देशाने १९ जून रोजी कारंजा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा यांच्या संयुक्त वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगार योजना तसेच रोजगार इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांनी केले आहे.
         या रोजगार मेळाव्यामध्ये मेगाफीड बायोटेक,वाशिम, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था वाशिम/यवतमाळ, महिंद्रा अँड महिंद्रा चाकण पुणे,पियाजीओ व्हेईकल्स,प्रा.लि., बारामती,पुणे, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड औरंगाबाद/ पुणे,टॅलेन सेतू सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे,बडवे इंजिनिअरिंग, औरंगाबाद इत्यादी नामांकित कंपनी/ उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे नोकरी इच्छुक उमेदवारांना खाजगी नोकरी/ रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे.
        जिल्ह्यातील दहावी, बारावी, आय.टी.आय (सर्व ट्रेड), पदवीधर (कला/वाणिज्य/विज्ञान), अभियांत्रिकी पदवीधर, इंजिनीरिंग डिप्लोमा (सर्व शाखा) इत्यादी शैक्षणिक पात्रता असणारे वयोमर्यादा १८ ते ४५ मधील युवक-युवतींच्या/ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येऊन विविध प्रकारच्या पदांकरिता १७० पेक्षा जास्त पदसंख्येवर त्याच दिवशी मुलाखत व उचित प्रक्रियेद्वारे प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.
            तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार व बेरोजगार युवक-युवतींनी १९ जून रोजी सकाळी १० वाजता आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स प्रतीसह व नुकतीच काढलेली 2 पासपोर्ट आकाराची फोटो व सेवायोजन कार्डसह स्वखर्चाने रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे. सेवायोजन कार्ड नसल्यास wwe.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन प्राप्त करून घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहावे.तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मेळाव्यात सहभागी व्हावे. काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक (०७१५२) २३१४९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे