फुटबॉल खेळासाठी 26 जुन रोजी अमरावती येथे निवड चाचणी
- Get link
- X
- Other Apps
फुटबॉल खेळासाठी 26 जुन रोजी अमरावती येथे निवड चाचणी
वाशिम, दि. 22 (जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम येथे विविध खेळाचे अयोजन करण्यात येते. जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची आवड युवा वर्गाला असल्याने क्रीडा क्षेत्रामध्ये खेळाडूंची संख्या वाढत आहे. तसेच खेळाडूंची नव्याने भरती करण्याकरीता क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने सुध्दा विविध खेळाचे आयोजन करण्यात येते. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणाकरीता व संघ उभारणी, नव्याने खेळाडूंची भरती करण्याकरीता १४ व १६ वर्षांखालील खेळाडूंची निवड चाचणी खेळाडूंची मानके पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे.
१४ वर्षांखालील खेळाडूंची जन्मतारीख ०१ जानेवारी २००९ ते ०१ जानेवारी २०१३ या दरम्यान असावी. खेळाडूंची उंची १५८ सेमीच्या वर असावी. १६ वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख ०१ जानेवारी २००६ ते ०१ जानेवारी २००८ या दरम्यान असावी. खेळाडूंची उंची १६८ सेमीच्या वर असावी. अशाप्रकारे फुटबॉल खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच जे खेळाडू निवड चाचणी निकष लक्षात घेऊन पात्र होतील त्यांची निवड चाचणी नेहरू स्टेडियम, अमरावती येथे २६ जुन २०२२ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच फुटबॉल खेळाचे निवड चाचणीचे निकष पुढीलप्रमाणे आहे. खेळाडूंची उंची,शारिरीक क्षमता, कौशल्य चाचणी व खेळातील कामगिरी इत्यादी बाबींवर निवड चाचणीचे निकष आहे.
अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे व बालाजी शिरसीकर यांच्याशी कार्यालयीन वेळेत कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता गुप्ता यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment