जिल्हाधिकाऱ्यांची आसेगाव (पेन) येथे भेट कृषीविषयक उपक्रमांची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांची आसेगाव (पेन) येथे भेट

कृषीविषयक उपक्रमांची पाहणी

वाशीम दि.१८(जिमाका) जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी १७ जून रोजी रिसोड तालुक्यातील आसेगाव(पेन) येथे भेट देऊन  राबविण्यात येत असलेल्या कृषीविषयक उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार अजित शेलार व तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         सरी-वरंब्यावर सोयाबीन लागवड, बीबीएफ यंत्राद्वारे सोयाबीन पेरणी व नीती आयोगाकडून महिला बचत गटांना दिलेले सीड ड्रेसिंग ड्रम व महिला बचत गटाने केलेली सोयाबीन तुरीची बीज प्रक्रिया याबाबतची माहिती श्री.षण्मुगराजन यांनी जाणून घेतली व उपस्थितांशी संवाद साधला. 
     यावेळी सरपंच विमल खानजोडे, पोलीस पाटील,रविकांत तिखे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संतोष खानजोडे,माजी सरपंच विजय थोरात, कृषी पर्यवेक्षक श्री धनकर,कृषी सहाय्यक ए.जी.इंगोले,जी.एस. शिरसाठ,तलाठी श्री वानखेडे,हनुमान आरु,संदीप चव्हाण,एम.टी.शिंदे, प्रगतिशील शेतकरी अनिल खानजोडे, दिगंबर खानजोडे,भारत खानजोडे, निलेश खानजोडे,संतोष लोणकर, शंकर रेखे, संतोष चव्हाण,भारत थोरात,संजय कानडे व विश्‍वनाथ  खानजोडे व सोयाबीन पेरणी करणारे शेतकरी आत्माराम लोणकर, सरी वरंब्यावर सोयाबीन लागवड करणारे शेतकरी पंढरी खांजोडे तसेच अण्णाभाऊ साठे स्वयंसहायता महिला बचतगट,मायावती स्वयंसहायता महिला बचत गटांच्या महिलांची यावेळी उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे