विधी स्वयंसेवकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न
- Get link
- X
- Other Apps
विधी स्वयंसेवकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न
वाशिम,दि. ४ (जिमाका) जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथील सभागृहात विधी स्वयंसेवक प्रशिक्षण ३ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजीव पांडे होते. मंचावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व वरीष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश विजय टेकवाणी,मुख्य लोक अभिरक्षक ऍड.परमेश्वर शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.पांडे म्हणाले, विधी स्वयंसेवक कायम जनतेच्या सतत संपर्कात असतो.त्यांनी कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी नेहेमी तत्पर असले पाहिजे.
प्रथम सत्रात मुख्य लोक अभिरक्षक ऍड.परमेश्वर शेळके यांनी महिला विषयक कायदे,फौजदारी कायदे,खावटी,कौटुंबिक हिंसाचार, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा,व अटकेच्या वेळी जामीनाबाबत अधिकार,याबाबत कायदेविषयक माहिती दिली
उप मुख्य लोक अभिरक्षक ऍड.वर्षा रामटेके यांनी बालमजुरी, अमली पदार्थ याविषयी,सहायक लोक अभिरक्षक ऍड. शुभांगी खडसे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण कायदा, महसूल कायदा व मालमत्ता कायद्याबाबत तर सहायक लोक अभिरक्षक ऍड.हेमंत इंगोले यांनी बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार कायदा, रॅगिंग कायदा, व बालविवाह प्रतिबंध कायदा याबाबत मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रात सहायक लोक अभिरक्षक ऍड. राहुल पुरोहित यांनी सायबर क्राईम, मोटर वाहन कायदा, व पर्यावरण विषयक कायदे याबाबत तर ऍड अतुल पंचवटकर यांनी लोक न्यायालय, मध्यस्थी, वैकल्पिक वाद निवारण, विधी सेवा प्राधिकरण कार्य बाबत तर विधी सेवा प्राधिकरण चे सचिव विजय टेकवाणी यांनी विधी स्वयंसेवकांची जवाबदारी व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करून विधी स्वयंसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्याभरातील विधी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार विधी स्वयंसेवक सुशील भिमजियाणी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment