सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कारंजा येथील निसर्ग पर्यटन केंद्राचे नामकरण



सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते 
कारंजा येथील निसर्ग पर्यटन केंद्राचे नामकरण 

वाशिम दि. 15 (जिमाका) कारंजा येथील वन विभागाच्या निसर्ग पर्यटन केंद्राचे नामकरण सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी आज 15 ऑगस्ट रोजी नामकरणाच्या कोनशिलेचे अनावरण केले.या पर्यटन केंद्राचे नामकरण आता स्व.प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्र असे करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस,यवतमाळ वनवृत्तचे वनसंरक्षक वसंत घुले,वाशिमचे उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती श्रीमती सई डहाके,दत्तराज डहाके,युसुफ पुंजानी व वसंत घुईखेडकर यांची उपस्थिती होती.
            निसर्ग पर्यटन केंद्राच्या नामकरण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना श्री.वळसे - पाटील म्हणाले, स्व.प्रकाशदादा डहाके यांनी या पर्यटन केंद्राबाबत माझ्याशी अनेकदा चर्चा केली.एखाद्या शहरामध्ये अशाप्रकारची निसर्ग पर्यटन केंद्राची सुविधा उपलब्ध करून देणे ही साधी गोष्ट नाही. स्व.प्रकाशदादाचे स्वप्न होते की,कारंजातील नागरिकांना निसर्ग पर्यटन केंद्र उपलब्ध झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.वन विभागाने त्याला प्रतिसाद दिला.या निसर्ग पर्यटन केंद्रामुळे पर्यावरणपूरक वातावरणात राहण्याचा आनंद नागरिकांना मिळणार आहे. निसर्ग केंद्रातील जैवविविधता बघून नागरिक वृक्ष लागवड व संवर्धन करण्यास प्रोत्साहित होतील.या निसर्ग पर्यटन केंद्रात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वनमंत्री श्री.मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.असे ते म्हणाले.
              निसर्ग पर्यटन केंद्राच्या निर्मितीस सहकार्य करणारे इंजिनिअर गजानन खेर,गोलू पुरोहित व अक्षय मुंगणे यांचा श्री.वळसे पाटील यांनी सत्कार केला.
         यावेळी श्री.वळसे - पाटील यांनी निसर्ग पर्यटन वाहनातून पर्यटन केंद्राची पाहणी केली.निसर्ग पर्यटन केंद्रात वृक्षारोपण केले.कार्यक्रमाला कारंजा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक वनसंरक्षक अमित शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
*असे आहे निसर्ग पर्यटन केंद्र*

हे निसर्ग पर्यटन के 93 हेक्टर क्षेत्रावर आहे.यामध्ये बालकांसाठी बाल उद्यान आहे.बिबट,चितळ,सांबर, हरीण अशा विविध वन्यप्राण्यांच्या बोलक्या प्रतिमा या पर्यटन केंद्रात आहे.कॅक्टस उद्यान, जपानी पध्दतीने वृक्षलागवड केलेले मियावाकी उद्यान,विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती,विविध प्रकारचे पक्षी व सरपटणारे प्राणी या उद्यानात आहे.ध्यान केंद्रसुद्धा आहे.निसर्ग पायवाट,निसर्ग पर्यटन वाहन,निसर्ग निर्वाचन संकुल,नैसर्गिक पाणवठे व बंधारे,व्यायामशाळा,रोपवाटिका,
सायकल सफारी,गवती कुरणाचे जंगल तसेच नक्षत्र वन यामध्ये आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे