13 ते 15 ऑगस्ट 2023 घरोघरी तिरंगा " अभियानात उत्साहाने सहभागी व्हाजिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांचे आवाहन


13 ते 15 ऑगस्ट 2023

घरोघरी तिरंगा " अभियानात उत्साहाने सहभागी व्हा

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांचे आवाहन

*वाशिम दि.12(जिमाका)* भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोहाच्या निमित्ताने आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने *'घरोघरी तिरंगा '* हे अभियान जिल्हयात 13,14 आणि 15 ऑगस्ट 2023 या तीन दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन साजरे करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले आहे.
          जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी  13,14 आणि 15 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत आपल्या घरावर राष्ट्रध्वज सन्मानपुर्वक फडकवावा. 
             राष्ट्रध्वज सन्मानाने फडकाविताना राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन राष्ट्रध्वजास सलामी दयावी. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी.
            तसेच *'घरोघरी तिरंगा'* हे अभियान प्रत्येक शासकीय कार्यालयात सुद्धा राबविण्यात यावे.  जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी, शाळा,महाविद्यालये तसेच शासकीय आणि निमशासकीय संस्था,खाजगी संस्था,महामंडळे,शासकीय व खाजगी इस्पितळे,सार्वजनिक आस्थापना तसेच खाजगी आस्थापना कार्यालये, कारखाने व दुकाने इत्यादी ठिकाणी  हे अभियान उत्स्फूर्तपणे राबवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे