सोयाबीनवर पिवळा मोझॅक कृषी विभागाच्या उपाययोजना
सोयाबीनवर पिवळा मोझॅक
कृषी विभागाच्या उपाययोजना
वाशिम, दि. 14 (जिमाका) : जिल्हयात मागील काही दिवसांपासून घेण्यात आलेल्या सोयाबीन पिकाच्या निरीक्षणावरुन काही ठिकाणी सोयाबीन पिकावर सोयाबीन पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वतीने सल्ला दिला जात आहे. सद्यस्थितीत सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या अवस्थेत फक्त काही झाडांवरच हा प्रादुर्भाव आढळून येतो, परंतू नंतर मात्र पांढऱ्या माशीमुळे या रोगाचा प्रसार होतो व संपुर्ण पीक सोयाबीन पिवळा मोझॅकला बळी पडू शकते. म्हणून सोयाबीन पिकावर सोयाबीन पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी पुढीलप्रमाणे शिफारशीनुसार फवारणी करावी. या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
सोयाबीन पिवळा मोझॅकने ग्रस्त झाडे तात्काळ उपटून घ्यावी किंवा नष्ट करावी. एकरी 15 ते 20 पिवळे चिकट सापळे लावावे. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम 12.60 टक्के, लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50 टक्के, झेड सी 2.5 मिली आणि 10 लिटर पाणी किंवा बिटासायफ्लुथ्रीन 8.49 टक्के, इमिडाक्लोप्रीड 19.81 टक्के 7 मिली आणि 10 लिटर पाण्यात मिसळून या किटकनाशकाची तात्काळ फवारणी करावी. शेतकऱ्यांनी याप्रमाणे सोयाबीनवर फवारणी करावी. शिफारशीनुसार लेबल क्लेम औषधाचा वापर करावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.
*******

Comments
Post a Comment