राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा: राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा सत्कार




राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा सत्कार

       वाशिम, दि. 30 (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात ज्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा प्राविण्य प्राप्त केले, अशा खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहीती अधिकारी विवेक खडसे होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, प्राचार्य संजय शिंदे, प्राचार्य संतोष राठोड, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, क्रीडा अधिकारी मारोती सोनकांबळे आणि संतोष फुफाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

           श्री. खडसे म्हणाले, खेळाडूंनी खेळाप्रती समर्पित असावे व आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचण्याची जिद्द ठेवावी. खेळ खेळत असतांना शिक्षणाकडे दुर्लक्ष न करता शिक्षणामध्ये सुध्दा प्राविण्य प्राप्त करुन आपल्या बुध्दीमतेची चुनुक दाखवावी. खेळतांना खेळाडू वृत्तीने खेळावे. तसेच त्यांनी खेळतांना क्रीडा मार्गदर्शकांचे अनमोल असे मार्गदर्शन घ्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

           यावेळी ज्या संघानी राज्यस्तरावर शालेय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविले आहे असे अनुक्रमे मैनागिरी विद्यालय टो (जुमडा), कबड्डी राज्यस्तर प्रथम क्रमांक, स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगांव कबड्डी राज्यस्तर द्वितीय क्रमांक, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या शाळा, मानोरा राज्यस्तर कबड्डी द्वितीय क्रमांक, ककुबाई कन्या शाळा कारंजा टेनिक्वाईट राज्यस्तर प्रथम क्रमांक, जे.सी हायस्कुल, कारंजा डॉजबॉल तृतीय क्रमांक, जे.डी. चवरे विद्यालय, कारंजा टेनिक्वाईट राज्यस्तर तृतीय क्रमांक, मातोश्री पार्वतीबाई नाईक कन्या शाळा, मंगरुळपीर आट्यापाट्या राज्यस्तर तृतीय क्रमांक पटकाविला.

           हर्षल मनवर, प्रणव गोटे, प्रणव छापरवाल (सॉफ्टटेनिस), जय जावळे, खुशी गाभणे, चैतन्य चव्हाण, यश सोनवणे, वेद सोकुलकर, ओम वहीले, चेतन प्रविण भोणे (सिकई मार्शल आर्ट), अक्षरा अमित नेटके, मंथन म्हातारमारे, अमोल जोधळेकर, (टेनिक्चाईट), ऋतुराज किशोर बोंडे, ईश्वरी ठाकरे, समिक्षा चौधरी (हॅण्डबॉल), हर्षिता गायकवाड, सार्थक खरात, प्रांजली राऊत, प्रिया राऊत, प्रबोध अढाव, (कराटे), गजानन कुऱ्हे, गुरुदेव सोनार (कबड्डी), ऋषभ अजय ठवळे (रायफल शुटिंग), वेदांत संजय बाजड (धनुर्विद्या), जिवक राहुल खंडारे (तलवारबाजी) या राज्य पदक विजेते आणि राष्ट्रीय सहभाग व पदकविजेते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

          क्रीडा दिन व क्रीडा सप्ताहाअंतर्गत जिल्हास्तर लॉनटेनिस स्पर्धेमध्ये एकेरीत कुणाल व्यास प्रथम तर अजय दहात्रे याने द्वितीय क्रमांक पटकाविला. दुहेरीत डॉ.गणेश शिंदे, विनोद वानखेडे विजयी तर डॉ. मनिष पावसे व डॉ. विजय कानडे उपविजयी ठरले. कबड्डीमध्ये जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, वाशिम विजयी तर खेलो इंडीया कबड्डी प्रशिक्षण केंद्र उपविजयी ठरले. यावेळी विजयी व उपविजयी खेळाडूंना प्रमाणपत्र व पदक देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सत्कार कार्यक्रमादरम्यान विविध खेळाचे प्रशिक्षक, खेळाडू व पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

          कार्यक्रम यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील प्रकाश मोरे, शुभम कंकाळ, भारत वैद्य, कलीम बेग मिर्झा, विनोद जवळकर व सुरज भड आणि जिल्हा प्रशिक्षण केंद्रांचे खेळाडूंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन वृक्षा तोडासे यांनी केले. उपस्थितांचे आभार राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांनी मानले.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे