पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 10 ऑगस्टला तिर्थक्षेत्र उमरी विकास कामांची पायाभरणी
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते 10 ऑगस्टला तिर्थक्षेत्र उमरी विकास कामांची पायाभरणी
वाशिम,दि.८ (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालेल्या उमरी - पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांचे भुमिपूजन १२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते संपन्न झाले.
या विकास आराखड्यातील तिर्थक्षेत्र उमरी येथील प्रत्यक्ष कामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम सामकी माता मंदिर परिसर,उमरी येथे
समाजातील संत-महंताच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी व समाजातील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थिती राहणार आहे.तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन प्रशासन,महंत यशवंत महाराज व उमरी ग्रामस्थांनी केले आहे.
Comments
Post a Comment