पालकमंत्र्यांनी घेतले पोहरादेवी व उमरी येथे दर्शन
पालकमंत्र्यांनी घेतले पोहरादेवी व उमरी येथे दर्शन
वाशिम दि.१० (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड हे आज १० ऑगस्ट रोजी उमरी - पोहरादेवी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र उमरी येथे विकास कामांच्या पायाभरणी कार्यक्रमाला आले असता त्यांनी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे भेट दिली. भेटीदरम्यान श्री.राठोड यांनी सर्वप्रथम माता जगदंबा देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संत सेवालाल महाराज व संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.बंजारा धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराजांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.उमरी येथे संत जेतालाल महाराज व सामकी माता मंदिरात जावून समाधीचे दर्शन घेतले.
Comments
Post a Comment