जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार सादरीकरण कार्यशाळा संपन्न

जादूटोणा विरोधी कायदा व चमत्कार 
सादरीकरण कार्यशाळा संपन्न 

 वाशिम ,दि.११ (जिमाका) बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,वाशिम तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जादुटोणाविरोधी कायदा दशक पूर्तीच्या निमित्ताने जादुटोणा विरोधी कायद्याचे विश्लेषण व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणारा सप्रयोग व्याख्यानाचा संपन्न झाला. 
         कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या.विजय टेकवाणी होते.प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ. सुप्रिया नायर,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड,सखाराम ढोबळे, विजय शिंदे,पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव,श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय,वाशिमचे प्राचार्य श्री.जमदाडे,श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय वाशिमचे प्रा. हिवसे,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
             प्रास्ताविकातून युवराज राठोड यांनी अंधश्रद्धा विरोधी कायद्याची गरज का निर्माण झाली याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. अंधश्रद्धा विरोधी कायदा लागू करण्यामध्ये आदरणीय नरेंद्र दाभोळकरांचे मोठे योगदान आहे. समाजातून अंधश्रद्धा दूर करुन बुद्धिप्रामाण्यवाद, विवेकवाद वाढवणे गरजेचे आहे असे सांगितले.
              न्या. टेकवाणी म्हणाले, जादूटोणाविरोधी कायद्याची दशक पूर्ती झाली आहे,परंतु आजही समाजामध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावी प्रचार व प्रसार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगून संपूर्ण जग जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना सुशिक्षित समाजामध्ये वाढत असलेल्या अंधश्रद्धा ही चिंतेची बाब असून आदिवासी समाज देखील अंधश्रद्धेपासून दूर जात आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. 
             महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेला ३४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच जादूटोणाविरोधी कायद्याला महाराष्ट्र सरकारने संमती देऊन दहा वर्षे पूर्ण झाले निमित्त आयोजित कार्यशाळेत मुंबई येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. सुप्रिया नायर यांनी मन व मनाचे आजार व त्या संदर्भातील अंधश्रद्धा या विषयावर  मार्गदर्शन केले.             
     अनिस वाशिम शाखा कार्याध्यक्ष तथा व अशासकीय सदस्य जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीचे पी एस खंदारे यांनी प्रात्यक्षिकासह चमत्कार सादरीकरण करून जादूटोणाविरोधी कायद्यामधील विविध तरतुदींवर प्रकाश टाकला. हा कायदा पारित करणारे महाराष्ट्र हे भारतामधील पहिले राज्य होते.या कायद्यामुळे अनेक चुकीच्या रूढी, प्रथा,परंपरा व शोषणकारी अंधश्रद्धांना आळा बसला आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 
          कार्यक्रमाचे संचालन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते महेश देवळे व आभार श्री .राठोड यांनी मानले.या कार्यक्रमाकरीता सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील अंनिसचे कार्यकर्ते,समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थीनी,अनिल गायकवाड,व्यवस्थापक व सर्व ब्रिक्स प्रा.लि.व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे