प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्वासाठी संस्थांकडून प्रस्ताव मागविले
- Get link
- X
- Other Apps
प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्वासाठी
संस्थांकडून प्रस्ताव मागविले
वाशिम, दि. 02 (जिमाका) : बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याकरीता प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व व अनुरक्षण या संस्थेतर सेवांच्या अंमलबजावणीसाठी शासनाने निर्णय घेतला आहे.
या समितीची १९ जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयामधील नमूद मार्गदर्शक सूचनेनुसार प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व व अनुरक्षण या संस्थेस्तर सेवांच्या अंमलबजावणीसाठी १ स्वयंसेवी संस्थेतील १ प्रतिनिधीची जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरून निवड करणे आवश्यक आहे. ज्या संस्थांना बाल कल्याण क्षेत्रातील अनुभव आहे किंवा कुटूंब सक्षमीकरण किंवा समाजातील बालकांच्या विकासाकरीता संस्थाबाह्य कार्यक्रम राबवीत असलेल्या संस्थानी आपले प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, खोली क्र. २०४ जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे प्रस्ताव सादर करावे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment