सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी वैशाली गोरे यांना साडी - चोळी भेट


सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्या हस्ते 
वीरपत्नी वैशाली गोरे यांना साडी - चोळी भेट 

वाशिम दि.15 (जिमाका) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त आज 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी वैशाली गोरे यांना साडी चोळी,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैभव सरनाईक,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, वाशिम उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर,तहसीलदार गजेंद्र मालठाणे,शहीद अमोल गोरे यांचे वडील तानाजी गोरे व आई  मंदाबाई गोरे यावेळी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे