नॅक्युम योजना : भूजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
नॅक्युम योजना : भूजल व्यवस्थापन आराखडा
जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर
वाशिम, दि. 14 (जिमाका) : केंदीय भूजल बोर्ड, मध्य नागपुर, जलशक्ती मंत्रालयाच्या सहाय्यक भूवैज्ञानिक पोर्णीमा बाराहाते व श्री. अमरनाथ असिस्टंट हायड्रॅलॉजीस्ट यांनी 11 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची भेट घेऊन वाशिम जिल्हयातील भूजल व्यवस्थापन आराखडा सादर केला. यात जलचर नकाशे, भूजल व्यवस्थापन आराखडा आणि जुने आणि आताचे संसाधन मुल्यांकन तयार केले असून, त्याबाबत चर्चा करुन त्याची माहिती सादर केली.
या आराखडयात जिल्हयातील पाण्याची पातळी, भूजलाचे व्यवस्थापन, जिल्हयातील पाण्याची उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता, पाण्याची कोणत्या क्षेत्रात आवश्यकता आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हा आराखडा अत्यंत महत्वाचा असुन भविष्यात उपयोग करता येईल. असे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांनी सांगीतले.
आराखडयात प्रस्तावित केलेल्या कामांचे नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. कडु, कनिष्ठ भूवैज्ञानिक चेतन रुपवते, जिल्हा परिषदेचे लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मापारी व भनखुडे, सहाय्यक भूवैज्ञानिक गोलांगे, कनिष्ठ भूवैज्ञानिक शत्रृघ्न दंदे, श्री. घोडेस्वार, ग्रामिण पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता किरण कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
*******
Comments
Post a Comment