विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती पाण्डेय यांची शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट


विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती पाण्डेय यांची शेलुबाजार प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट 

वाशिम दि.23 (जिमाका) विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज 23 ऑगस्ट रोजी मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील आरोग्यवर्धिनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.,परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, तहसीलदार रवि राठोड व तालुका आरोग्य अधिकारी तथा शेलुबाजारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती 
          भेटीदरम्यान डॉ.श्रीमती पाण्डेय यांनी आरोग्य केंद्रातील सर्व कक्ष व वार्डची पाहणी केली.तसेच तेथील कामकाजाची तपासणी केली.औषधी भांडारची पाहणी करून कोणकोणत्या प्रकारची औषधे भांडार शाखेत उपलब्ध आहेत तसेच ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत का याची माहिती घेतली.सलाई,सर्पदंश झाल्यास इंजेक्शनची व्यवस्था व कुत्रा चावल्यास रॅबिज प्रतिबंधक इंजेक्शन उपलब्धतेबाबतची माहिती त्यांनी घेतली.
       आरोग्य विभागाचे कामकाज व उपलब्ध औषधीसाठयाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कोरे यांनी यावेळी दिली.तत्पूर्वी त्यांनी कारंजा तालुक्यातील वाई येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची तसेच नोंदणी रजिस्टर बघून किती नोंदी करण्यात आल्या हे बघितले. वाई येथील उपकेंद्राच्या परिसरात वृक्षारोपण केले.प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या कामकाजाबाबत डॉ. श्रीमती पाण्डेय यांनी समाधान व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे