वाशीमच्या नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रात रोगनिदान शिबीर अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
वाशीमच्या नागरी आरोग्यवर्धीनी केंद्रात रोगनिदान शिबीर
अनेक रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
वाशिम दि.26 (जिमाका) वाशिम येथील बागवानपुरा येथील नागरी आरोग्यवर्धीनी उपकेंद्र येथे आज 26 ऑगस्ट रोजी मोफत रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धर्मपाल खेळकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. परभणकर,वैद्यकीय अधिकारी डॉ रुईकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा जाधव,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विजय बल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात हृदयरोग,मधुमेह, रक्तदाब,मेंदूचे विकार गुप्तरोग, फुफ्फुसाचे आजार,किडणी आजार, थॉयरॉईड,त्वचारोग,कान,नाक,घसा, क्षयरोग,कुष्ठरोग,नत्ररोग,स्त्री रोग, लहान मुलांचे आजार ईत्यादिवर निदान व उपचार करण्यात आले.
या शिबिराचा लाभ शेकडो रूग्णांनी घेतला.यावेळी फिरत्या डिजीटल एक्स - रे वाहनाने संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी करण्यात आली.क्ष -किरण वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी 53 क्षयरूग्ण संशयितांचे एक्स रे काढले. यावेळी डॉ.डीगंबर ढोले, डॉ.सुशील खुळे,डॉ.महिमा शेळके,संदीप जाधव, आरोग्य निरीक्षक श्री सोनोने,श्री. प्रविण करखेडे,आरोग्य सेवक श्री.गोटे श्रीमती सरकटे, आरोग्य सेविका श्रीमती लबडे,श्रीमती कांबळे, गटप्रवर्तक श्रीमती वनमाला शेळके, रामेश्वर सोनूने,मंगेश पिंपरकर, श्री.कळमकर,अतुल बोरचाटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ मयुरी मार्कंड, तेजमल दागडिया,श्री घुमरे,श्रीमती वारकरी,श्री.कासारे,श्री.गावंडे तसेच सर्व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यावेळी 28 संशयित क्षय रुग्णाचे थुंकीचे नमुने गोळा करण्यात आले.तसेच सर्व संशयितांना सकाळी थुंकीचे नमुने देण्याबाबत सांगण्यात आले.सर्व उपस्थितांना क्षयरोग,डेंग्यू, हिवतापबाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी नागरी आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक नितीन व्यवहारे,जिल्हा क्षयरोग केंद्राचे आरोग्य निरीक्षक रामदास गवई यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment