जिल्हा रुग्णालय व क्रीडा विभागाचा पुढाकार आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्त मॅरॉथॉन स्पर्धा उत्साहात



जिल्हा रुग्णालय व क्रीडा विभागाचा पुढाकार

आंतरराष्ट्रीय युवा दिननिमित्त मॅरॉथॉन स्पर्धा उत्साहात

        वाशिम, दि. 18 (जिमाका)  18 ऑगस्ट या आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त राज्य एडस नियंत्रण संस्था, मुंबई अंतर्गत जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा रुग्णालय, वाशिम आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त वतीने आज 18 ऑगस्ट रोजी वाशिम शहरात एडस जनजागृती मॅरॉथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. परभणकर, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.  प्रकाश मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हरण, डॉ. अनिल रुईकर, क्रीडा अधिकारी श्री. सोनकांबळे, जिल्हा मॅरॉथॉनचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब गोटे, प्रा. संजय शिंदे व डॉ. रवि घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.

            आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित या मॅरॉथॉन स्पर्धेची “तरुणांसाठी हरित क्रांती-जगाच्या शाश्वत विकासासाठी हरित क्रांती तरुणांची ” या घोषवाक्याने सुरुवात करण्यात आली. या मॅरॉथॉन स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा क्रीडा संकुलातून करण्यात आला. ही मॅरॉथॉन स्पर्धा सिव्हील लाईन-काटारोड चौक-अकोला नाका व जिल्हा रुगणालयासमोरुन क्रीडा संकुलात पोहोचून या स्पर्धेचा समारोप झाला.

           स्पर्धेत महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले. समारोपीय कार्यक्रमाच्यावेळी डॉ. खेळकर व डॉ. कोरे यांच्या हस्ते एचआयव्ही/एडस या माहिती हस्तपत्रकांचे प्रकाशन व एचआयव्ही प्रतिबंधक स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेत सहभागी युवक-युवतींपैकी प्रथम क्रमांक प्रथमेश देशमुख, व्दितीय क्रमांक सोहिल खराटे, तृतीय क्रमांक प्रविण चौधरी. महिला गटामध्ये प्रथम क्रमांक वैष्णवी आयेवार, व्दितीय क्रमांक शितल ठाकूर आणि तृतीय क्रमांक रुतीका नंदेवार यांनी पटकाविला. यामध्ये जवळपास 250 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

           स्पर्धेसाठी श्री. सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, श्री. गुणवंत शिक्षण संस्था, ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक व बहुउद्देशिय संस्था, विहान प्रकल्प वाशिम, जिल्हा स्काऊट संघटक वैशाली घोम व मनिषा ढोके, मॅरॉथॉन पायलट समुह तसेच पोलीस विभागाची वाहतूक शाखा व जिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिकासह चमू यांनी सहकार्य केले.

          स्पर्धा व समारोपीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पर्यवेक्षक रवि भिसे, समुपदेशक पंढरी देवळे, डी.आर. मनवर, विनोद रत्नपारखी, अनिल राठोड, निलेश अल्लाडा, श्रीमती आगासे, श्रीमती अवचार, श्रीमती वानखेडे, श्री. मेसरे, श्रीमती मोरे, जिशा वरीद, बाबाराव भगत, स्वप्नील सरनाईक, शांताराम गायकवाड यांचेसह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे संचालन समुपदेशक पंढरी देवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार मिलींद घुगे यांनी मानले.     

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे