जि.प.पदभरती : विविध प्रकारच्या २४२ पदांसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना
- Get link
- X
- Other Apps
जि.प.पदभरती : विविध प्रकारच्या २४२ पदांसाठी उमेदवारांना सर्वसाधारण सूचना
वाशिम,दि.४ (जिमाका) जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत गट क संवर्गाची विविध १८ प्रकारची पदे भरण्यात येणार असुन (वाहन चालक व गट ड संवर्गाची पदे वगळुन) यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका( महिला), औषध निर्माण अधिकारी,कंत्राटी ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता,कनिष्ठ सहाय्यक,वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका,पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्चश्रेणी,विस्तार अधिकारी (कृषी),विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असे विविध एकुण सर्व मिळुन २४२ पदे भरावयाची आहेत.ही पदे भरण्याबाबत शैक्षणिक अर्हता, अनुभव,वेतनश्रेणी,परिक्षेचे स्वरुप, वयोमर्यादा,सामाजिक,समांतर व सर्व प्रकारचे आरक्षण,माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त,भुकंपग्रस्त,अंशकालीन कर्मचारी,अनाथ,दिव्यांग,फॉर्म भरण्याची पध्दत व मुदत तसेच आवश्यक कागदपत्रे,फॉर्म भरण्यासाठी लागणारी फी व पध्दती ईत्यादी सर्व माहिती जिल्हा परिषद वाशिमच्या www.zpwashim.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.तसेच ऑनलाईन पध्दतीने फॉर्म भरण्यासाठी व परीक्षा प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
एकाच पदाची ऑनलाईन परिक्षा सर्व जिल्हयात एकाच वेळी होणार असल्यामुळे उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हयात अर्ज केल्यास उमेदवाराला एकाच वेळेस एकापेक्षा जास्त ठिकाणाचे परिक्षा प्रवेशपत्र प्राप्त झाल्यास व त्या ठिकाणी परिक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद वाशिम जबाबदार राहणार नाही,याची नोंद घ्यावी.तसेच उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http:// www.cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा १८००२२२३६६/१८००१०३४५६६ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा व उमेदवारास जाहीरातीमध्ये काही समस्या उद्भवल्यास जिल्हा परिषद,वाशिमचा भ्रमनध्वनी क्र. ०७२५२-२३२८६२ या हेल्पलाईनवर सोमवार ते शुक्रवार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० पर्यत (शासकिय सुट्टीचे दिवस वगळून) संपर्क साधावा, जिल्हा परिषद वाशिमअंतर्गत वेगवेगळया १८ पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी विहीत मुदतीत अर्ज करावेत,ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारचे अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.असे अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस आणि जिल्हा निवड समितीच्या सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी कळविले आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment