18 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त मॅराथॉन स्पर्धा
18 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त
मॅराथॉन स्पर्धा
वाशिम, दि. 14 (जिमाका) : जगाच्या शाश्वत विकासासाठी “ हरित क्रांती तरुणांची ” हे या वर्षाचे घोष वाक्य आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व जिल्हा रुग्णालय, वाशिमच्या संयुक्त वतीने १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथील क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमीत्त वाशिम शहरात भव्य मॅराथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. एच आय व्ही/ एडस या विषयावर युवकांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्यात येणार आहे. या स्पर्धेत महाविद्यालयीन १८ ते २५ या वयोगटातील विद्यार्थी सहभागी असणार आहेत.
पुरुष (युवक) - गटाकरीता प्रथम पारीतोषीक २ हजार ५०० रुपये, व्दितीय १ हजार ७५० रुपये आणि तृतीय पारीतोषीक १ हजार रुपये आणि (स्त्री (युवती) - गटाकरीता प्रथम पारीतोषीक २ हजार ५०० रुपये, व्दितीय १ हजार ७५० रुपये आणि तृतीय पारीतोषीक १ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ही स्पर्धा ५ कि.मी असणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी नांव नोंदणीसाठी जिल्हा पर्यवेक्षक जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, एआरटी केंद्र, जिल्हा रुग्णालय, वाशिम येथे करावी. व्हाट्सॲपसाठी भ्रमणध्वनी क्रमांक (७७२०९१८२९७) असा आहे.
या स्पर्धेला विविध विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थितीसह वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार आहे. मॅराथॉन स्पर्धेसाठी जास्तीत जास्त महाविद्यालये, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना तथा राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरीकांनी स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.धम्मपाल खेळकर यांनी केले आहे.
*******
Comments
Post a Comment