धनगर समाज बांधवांसाठी घरकुल योजनाल ाभ घेण्यासाठी प्रस्ताव मागविले





धनगर समाज बांधवांसाठी घरकुल योजना

लाभ घेण्यासाठी प्रस्ताव मागविले

          वाशिम, दि. 18 (जिमाका) : धनगर समाजासाठी वैयक्तिक लाभाची घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे. धनगर समाज बांधवांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामीण भागात राहणाऱ्या धनगर समाजातील बांधवांसाठी 10 हजार घरकुल देण्याचा निर्णय शानाने घेतला आहे. या योजनेसाठी जातीचा दाखला, आधार कार्ड, 1 लक्ष 20 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नाचा दाखला, अल्पभूधारकाचा दाखला, राज्यात अधिवास असल्याचा दाखला, रेशन कार्ड, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कोणत्याही घरकुलचा यापूर्वी लाभ घेतला नसल्याचे हमी पत्र व नमुद केलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून विहीत नमुन्यात प्रस्ताव ग्रामपंचायतकडे सादर करावा.

          या योजनेकरीता इच्छुक लाभार्थ्यानी अधिक माहितीकरीता तसेच अर्ज मिळण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी, संबंधित पंचायत समिती किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचेकडे संपर्क साधावा. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे. 

                                                                                                                                  *******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे