कोटपा कायदयाबाबत खापरदरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


कोटपा कायदयाबाबत खापरदरीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  

वाशिम,दि.४ (जिमाका) राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय वाशिम अंतर्गत आज ४ ऑगस्ट रोजी मानोरा तालुक्यातील खापरदरी येथील श्री.गजाधरजी राठोड विजाभज प्राथमिक आश्रमशाळेत तंबाखू नियंत्रण मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 
यावेळी मानसशास्त्रज्ञ राम सरकटे यांनी तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन त्याचे विविध प्रकार व त्यापासून कसे परावृत्त व्हावे याबाबत माहिती दिली.सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने आरोग्यावर / शरीरावर होणारे विविध परिणाम,तंबाखूमुक्त शाळेचे निकष याबाबत मार्गदर्शन केले जिल्हा सल्लागार डॉ.आदित्य पांढारकर यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे मुख कर्करोग व त्याची प्राथमिक लक्षणे. *कोटपा  कायदा २००३* याबाबत विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री.रोकडे व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे