पालकमंत्री संजय राठोड 10 ऑगस्टला पोहरादेवीत
- Get link
- X
- Other Apps
पालकमंत्री संजय राठोड 10 ऑगस्टला पोहरादेवीत
वाशिम, दि. 09 (जिमाका) : पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे 10 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी 8 वाजता यवतमाळ येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने तिर्थक्षेत्र पोहरादेवीकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता श्री तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आगमन व दर्शन. सकाळी 9.50 वाजता तिर्थक्षेत्र उमरीकडे प्रयाण. सकाळी 10.10 वाजता तिर्थक्षेत्र उमरी येथे आगमन व मंदिर दर्शन. सकाळी 10.30 वाजता सामकीमाता मंदिर परिसर येथे उमरी-पोहरादेवी परिसरातील तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील तिर्थक्षेत्र उमरी विकास कामांच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सकाळी 11.45 वाजता पोहरादेवी येथील नंगारा म्युझियमकडे प्रयाण. दुपारी 12.05 वाजता नंगारा म्युझियम पोहरादेवी येथे आगमन व तिर्थक्षेत्र पोहरादेवी-उमरी विकास आराखडयातील विकास कामांबाबत यंत्रणांचा आढावा घेतील. दुपारी 1 वाजता पोहरादेवी येथून मानोरामार्गे नेरकडे प्रयाण करतील.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment