जनुना येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

जनुना येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न 

वाशिम,दि.११ (जिमाका ) तालुक्यातील ग्राम जनुना येथे आज ११ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनूना येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्री. विजय टेकवाणी होते. तर श्री. गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवार,मुख्य लोक अभिरक्षक ऍड श्री. परमेश्वर शेळके, जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समितीचे अशासकीय सदस्य  पि. एस. खंडारे, उप सरपंच रेखा राहुल राठोड, ऍड. पी.डी. भालेराव आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

   कार्यक्रमाची सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी पि. एस. खंडारे यांनी जादूटोणा विरोधी कायद्याबाबत, तर मुख्य लोक अभिरक्षक ऍड. श्री. परमेश्वर शेळके यांनी आदिवासींचे हक्कांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी श्री. तोटेवार यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. 

      न्या. श्री. टेकवानी म्हणाले,‌ आपण सर्वांनी आपल्या अधिकारांबाबत सदैव जागरूक असले पाहिजे कोणालाही कायदेविषयक मार्गदर्शन हवे असल्यास अश्या नागरिकांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय येथे संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. विधी स्वयंसेवक शाहीर उत्तम ओंकार इंगोले यांनी आपल्या भारदस्त आवाजात पोवाडे व जनजागृतीपर गाणी म्हणून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विधी स्वयंसेवक मनीषा दाभाडे, व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनूनाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर काटकर यांनी परिश्रम घेतले. संचालन व आभार विधी स्वयंसेवक सुशिल भिमजियाणी यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे