मेरी माटी - मेरा देश "* अभियान सर्व गावात अभियानाचे यशस्वी आयोजन करा. वसुमना पंत



*" मेरी माटी - मेरा देश "* अभियान 

 सर्व गावात अभियानाचे यशस्वी आयोजन करा. 
                          वसुमना पंत

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गट विकास अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा

 

वाशिम दि.०७ (जिमाका) भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता समारोहाच्या निमित्ताने यावर्षी ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान " मेरी माटी मेरा देश " हे अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतीमध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी नुकताच सर्व गट विकास अधिकाऱ्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तयारीचा आढावा घेतला.

श्रीमती पंत यांनी यापुर्वीच हे अभिमान राबविण्याबाबत सर्व गट विकास अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या.त्याबाबत हा आढावा घेऊन सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.

केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते.त्यानुसार राज्यात व देशात मेरी माटी मेरा देश (मिट्टी को नमन, विरो को वंदन) हे अभियान राबविण्यात येत आहे.प्रत्येक ग्रामपंचायतीत या अभियानांतर्गत ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध प्रकारचे पाच उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 'वसुधा वंदन' उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत गावातील योग्य ठिकाण निवडून ७५ देशी वृक्षांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यत 
पोहोचविण्यात यावी यासाठी गावपातळीवरील सर्व शासकीय -  ‍ निम शासकीय कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरापर्यंत जाण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमती पंत यांनी बैठकीत सांगितले. यावेळी पंचायत विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत त्यांनी निर्देश दिले. सन २०२३-२४ वर्षाचे पंचायत समितीस्तरावरील विकास आराखडा ऑनलाईन अपलोड करुन वाशीम व कारंजा वगळता उर्वरित चारही पंचायत समित्यांनी विकास आराखडा ऑनलाईन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या जमा खर्चाच्या नोंदी व वार्षिक लेखे ऑनलाईन होणार नाहीत तोपर्यंत ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी खर्च करता येत नाही.त्यामुळे ग्रामपंचायत स्ततरावरील जमा खर्चाच्या नोंदी PRIAsoft  प्रिया सॉफ्टवर ऑनलाईन करून वार्षिक लेखे अद्यावत करण्याच्या सक्त सूचनाही त्यांनी  ‍दिल्या.

पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील खर्चाचे प्रमाण अत्यल्प असल्याने श्रीमती पंत यांनी  नाराजी व्यक्त केली. 

खर्चाचे प्रमाण वाढण्यासाठी सर्व गटविकास अधिकारी यांनी नियमित आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावर्षीपासून होणाऱ्या सर्व ग्रामसभांची नोंद ऑनलाईन होणार आहे. त्याकरिता शासनाने GS-Nirnay App (जीएस निर्णय ॲप) तयार केले आहे. त्याचा वापर नियमित करण्याच्या सुचना त्यांनी  दिल्या.

सद्यस्थितीत ३३४ ग्रामसेवक आणि १८९ सरपंच यांची GeM पोर्टलवर नोंदणी झाली असल्याचे लक्षात आणुन देत त्यांनी GeM प्रणाली वर सर्व ग्रामपंचायतीची नोंदणी करून ग्रामपातळीवरील सर्व खरेदी प्रक्रिया केवळ GeM द्वारेच करण्याचे निर्देश दिले.ग्रामपंचायत मधील सर्व रजिस्टर- नमुन १ ते ३३ नमुना एन्ट्री महा ई ग्राम प्रणालीवर करून गावातील जास्तीत जास्त नागरिकांना Maha eGram Citizen Connect App चा वापर करण्यास प्रोत्साहित करावे,या मोबाईल App द्वारे घरबसल्या विविध दाखले तसेच कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत प्राप्त दाखले तात्काळ निकाली काढणे तसेच नागरिकांचे अपील प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत यांनी दिले.

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित बैठकीला पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे