५ ऑगस्ट रोजी " सैनिकहो तुमच्यासाठी " कार्यक्रम
५ ऑगस्ट रोजी " सैनिकहो तुमच्यासाठी " कार्यक्रम
वाशिम,दि.१ (जिमाका) १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल
सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ५ ऑगस्ट रोजी " सैनिकहो तुमच्यासाठी " या संकल्पनेवर काम करण्याचे सर्व महसूल अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे.
जिल्ह्यातील सर्व सेवारत/सेवानिवृत्त सैनिक अधिकारी,माजी सैनिक,वीरपत्नी, विधवा,वीरमाता/विरपिता, माजी सैनिक पत्नी यांनी शनिवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये उपविभागीय अधिकारी
यांचे अध्यक्षतेखाली " सैनिकहो तुमच्यासाठी " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्याक्रमांतर्गत सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे महसूल कार्यालयाकडून
निर्गमित होणारे विविध दाखले / प्रमाणपत्रे, तसेच घर/शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित
असलेल्या समस्या / प्रश्नावर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत
असताना शहिद झालेल्या सैनिकांच्या अवलंबितांच्या व शौर्यपदक धारकांच्या जमीन वाटपाच्या
प्रलंबित प्रकरणावर कार्यवाही करण्यात येईल.तरी आपल्या समस्यांबाबत लेखी अर्जासह आपण संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय/तहसील कार्यालयात उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment