मनोधैर्य योजना*पीडित ५२ व्यक्तींना ७८ लाख ८० हजाराचे अर्थसहाय्य
मनोधैर्य योजना
*पीडित ५२ व्यक्तींना ७८ लाख ८० हजाराचे अर्थसहाय्य*
वाशिम, दि.६ (जिमाका) जिल्हा विधि सेवा प्राधिकरण,वाशिम यांनी जिल्हयातील अत्याचाराने पीडित ५२
व्यक्तींना या वर्षात ७८ लाख ८० हजाराचे अर्थसहाय्य देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.गुन्हा, घटना आणि परिणामाचे स्वरुप याचा अभ्यास करुन पीडितांना १० लाखांपर्यंतही मदत देण्यात येते.
केंद्र शासनाने २०१३ मध्ये मनोधैर्य योजना सुरु केली.दुष्कर्म, बालकावरील लैंगिक अत्याचार, अॅसिड हल्ला,अनैतिक व्यापार आदी पीडितांना या योजनेअंतर्गत त्यांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टिकोनातून अर्थसहाय्य केले जाते.
*प्राधिकरणाच्या सेवेचा २३४ जणांना लाभ*
दुर्बल,आर्थिक कमकुवत,महिला, ज्येष्ठ नागरिक,विशेष संवर्गातील व्यक्ती निःशुल्क विधि सेवेसाठी प्राधिकरणाकडे धाव घेत आहेत.सन २०२१ ते जुलै २०२३ या कालावधीत २३४ व्यक्तींना निःशुल्क विधि सेवा पुरवली आहे.कौटुंबिक वाद,वैवाहिक वाद,कौटुंबिक हिंसाचार आणि दिवाणी स्वरुपाचा वाद यांचा यामध्ये समावेश आहे.
*सामान्यांपर्यंत कार्य जातेय*
विधि सेवा प्राधिकरण जनजागृती कार्यक्रम घेत आहे.प्राधिकरणाकडे विधि सेवेसाठी प्राप्त होणारे अर्ज हे प्राधिकरणाचे विधि सेवेचे कार्य सामान्यांपर्यंत पोहोचत असल्याची प्रचिती आहे.
Comments
Post a Comment