सोयाबीन पिकास युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये !कृषी विभागाचे आवाहन


सोयाबीन पिकास युरिया खताची दुसरी मात्रा देऊ नये !

कृषी विभागाचे आवाहन

वाशिम,दि.1 (जिमाका) जिल्हयात या खरीप हंगामात झालेल्या पेरण्यापैकी ७५ टक्के क्षेत्रावर
सोयाबीन पिक घेण्यात आलेले आहे. सोयाबीन पिक हे कडधान्य वर्गातील असल्यामुळे
झाडाच्या मुळावर गाठी असल्यामुळे हवेतील उपलब्ध असलेले ७८ टक्के नत्र मुळावरील
गाठीद्वारे शोषुन घेऊन सोयाबीन पिकास उपलब्ध करुन देतात. त्यामुळे युरीया या खताची दुसरी
मात्रा देण्याची आवश्यकता नाही. परंतु काही शेतकरी बांधव सोयाबीन पिकास पेरणी नंतर ३०
ते ४० दिवसांनी युरिया हे रासायनीक खत देतात ही पध्दत चुकीचे आहे. सोयाबीन पिकास
युरीया खत दिल्यास कर्ब/ नत्राचे प्रमाण विषम होऊन पिकाची कायीक वाढ मोठया प्रमाणात
होऊन फुलधारणा व फळधारणा कमी होते, त्यामुळे उत्पादनात घट येते. परीणामत: युरीया
वरील अनाठाई खर्च वाढवुन पिकाचे उत्पादनात सुध्दा घट येते. विद्यापिठाच्या शिफारशीनुसार
शेंगा भरण्याची अवस्थेत दोन टक्के युरीया किंवा दोन टक्के डीएपीची फवारणी केल्यास दाणे
चांगले भरुन दाण्याचे वजनामध्ये वाढ होते. परीणामी उत्पादनात वाढ होते. तरी शेतकरी
बांधवाना आवाहन करण्यात येते की, सोयाबीन तसेच इतर सर्व कडधान्य पिकामध्ये युरीया
खताची दुसरी मात्रा देण्यात येऊ नये असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
आरीफ शहा यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे