उंबर्डाबाजार येथे " मेरी मिट्टी मेरा देश " अभियान*पालखी खांद्यावर घेऊन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी वृक्षदिंडीत सहभागी*



उंबर्डाबाजार येथे " मेरी मिट्टी मेरा देश " अभियान

*पालखी खांद्यावर घेऊन जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी वृक्षदिंडीत सहभागी*

वाशिम दि.13 (जिमाका) '" माझी माती माझा देश '" अभियानांतर्गत कारंजा तालुक्यातील ऊंबर्डाबाजार येथे आज जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षदिंडी काढुन अमृत रोपवाटिका तयार करण्यात आली.यावेळी श्रीमती बुवनेश्वरी पालखी खांदयावर घेऊन वृक्षदिंडीत सहभागी झाल्या.
           सुरुवातीला जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी यांच्या हस्ते ग्रामपंचायतने तयार करण्यात केलेल्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले.श्रीमती बुवनेश्वरी यांनी वृक्षदिंडीत पालखी खांद्यावर घेतल्याने गावकर्‍यांचा उत्साह वाढविला.यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, सरपंच श्रीराज चौधरी,उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे,गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड ,सहायक गट विकास अधिकारी कैलास घुगे, विस्तार अधिकारी संजय भगत,मनोज रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
             " माझी माती माझा देश " या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या अमृत रोपवाटिकेमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या फुलांची व देशी झाडे लावण्यात आली.
          जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.शाळेतील मुला-मुलींशी त्यांनी संवाद साधला. तसेच गावातील विकासकामांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे संचालन वर्षा ठाकरे यांनी केले.प्रस्ताविक व आभार ग्राम विकास अधिकारी जयकिसन आडे यांनी मानले.  
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजू बोडे,अरुण इंगोले,सुधाकर हळदे, अ. वहीद,अशोक उघडे, अशोक नेमाडे, गजानन महाराज भजनी मंडळ,सोपिनाथ भजनी मंडळ येवता यांच्या सदस्यांनी,आशाताई, अंगणवाडी सेविका आणि बचत गटाच्या महिलांनी परिश्रम घेतले. यावेळी उंबर्डाबाजार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                      ***

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे