पदवीधर मतदारांना संकेतस्थळावर मिळणार मतदान केंद्राची माहिती
वाशिम, दि. २६ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०१७ करिता दि. ३ फेब्रुवारी २०१७
रोजी मतदान होत आहे. याकरिता पात्र मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती
संकेतस्थळावर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी
यांनी कळविले आहे.
नवीन
पदवीधर मतदार यादी तयार करण्यात आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे मतदारांना
त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, याकरिता उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक,
पत्ता व मतदान केंद्राची माहिती www.washim.amtgraduate.com
या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचे आडनाव
व नाव टाईप केल्यानंतर पात्र पदवीधर मतदारांना त्यांचा अनुक्रमांक, नाव, पत्ता व
मतदान केंद्राची माहिती मिळेल. तरी पदवीधर मतदारांनी या संकेतस्थळावर जावून आपल्या
मतदान केंद्राविषयी माहिती करून घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी कळविले
आहे.
Comments
Post a Comment