अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इग्रजी माध्यमांच्या शाळेत विनामुल्य शिक्षणाची सुविधा

वाशिम, दि. ११ : अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये विनामुल्य शिक्षण देण्यात येते. सन २०१७-१८ मध्ये आदिवासी विकास विभागाकडून निवडण्यात आलेल्या शाळेमध्ये प्रवेश देण्यासाठी विनामुल्य अर्ज वाटप दिनांक १ जानेवारी २०१७ पासून सुरु झाले आहे. तरी अनुसुचित जमातीच्या विदयार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या दाखल्याची प्रत सादर करावी. तसेच प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा १ लाख रुपये इतकी राहील. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ५ वर्षे पूर्ण असावे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्रामसेवकाने दिलेला दाखला ग्राह्य धरण्यात येईल. विद्यार्थ्याचे पालक शासकीय/निमशासकीय सेवेत नसावेत. प्रवेश अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला, अग्रसेन भवन जवळ, महसुल भवन, अकोला (दूरध्वनी क्र. ०७२४-२४२५०६८) येथे किंवा नजिकच्या शासकीय अनुदानीत आश्रमशाळेत मिळतील. तरी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता व कोणाच्याही माध्यमातून प्रवेश अर्ज करुन न करता या कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधुन प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावा व या कार्यालयास सादर करावा, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश