वाशिम येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण






वाशिम, दि. २६ :  जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राखीव पोलीस निरीक्षक देविदास इंगळे यांच्या पथकाने ध्वजाला सलामी दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा हर्षदाताई देशमुख, खासदार भावनाताई गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के. आर. गाडेकर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या तसेच कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सानिकांना यावेळी पालकमंत्री ना. राठोड यांनी अभिवादन केले. तसेच ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, पत्रकार, अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर पालकमंत्री ना. राठोड यांनी पोलीस पथकांचे निरीक्षण केले.
पोलीस कमांडो पथक, पोलीस पथक, गृहरक्षक दलाचे पथक यांच्यासह सैनिक शाळा, जवाहर नवोदय विद्यालय यांच्या एन. सी. सी. पथकाने पथसंचालन करून मानवंदना दिली. यामध्ये पोलीस दलाचे स्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, वरुण वाहन, अग्निशमन दलाचे वाहन सहभागी झाले होते. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, रोखरहित व्यवहार, जलयुक्त शिवार अभियान, आरोग्य विभागविषयी माहिती देणारे चित्ररथही पथसंचालनात सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बालासाहेब बोराडे, मोहन सिरसाट यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन

प्रजसत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमप्रसंगी समाज प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करणायत आले होते. यामध्ये विविध शाळांचे विद्यार्थी, लोककलाकार सहभागी झाले होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वाशिम, सुंदर वाशिम’ नाटिकेतून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे