आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी



वाशिम, दि. ०९ : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता वाशिम जिल्ह्यात लागू झाली असून या आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  बैठकीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप, राजेश पारनाईक, डॉ. शरद जावळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक बळवंत गजभिये, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना दि. १० जानेवारी २०१७ रोजी प्रसिद्ध होणार आहे. दि. १७ जानेवारी २०१७ ही नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख असून नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. १८ जानेवारी रोजी होणार आहे. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख दि. २० जानेवारी २०१७ असून दि. ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. दि. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी मतमोजणी होईल. वाशिम जिल्ह्यात १८ हजार ७३६ पदवीधर मतदार असून जिल्ह्यात एकूण २९ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. मतदान शांततामय व निरपेक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जावे. आदर्श आचारसंहितेचा भंग, निवडणुकीबाबत काही तक्रार असल्यास किंवा निवडणुकीविषयी काही माहिती द्यावयाची असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेमधील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे