पदवीधर मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

वाशिम, दि. २२ :  भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ नोव्हेंबर २०१६ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सुचना प्रसिद्ध करून या कार्यक्रमास प्रारंभ होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
दिनांक १ ऑक्टोंबर २०१६ रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध होईल. दिनांक १५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. त्यानंतर दिनांक २५ ऑक्टोंबर २०१६ रोजी वर्तमानपत्रातील नोटिसीची द्विव्तीय पुनर्प्रसिद्धी करण्यात येईल. दिनांक ५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत नमुना १८ द्वारे दावे व हरकती स्वीकारल्या जातील. दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ पर्यंत हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई करण्यात येईल. दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याविषयी दावे व हरकती दिनांक २३ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २०१६ या कालावधीत स्वीकारल्या जातील. दावे व हरकती निकाली काढून दिनांक २६ डिसेंबर २०१६ रोजी पर्यंत  पुरवणी यादी तयार करून छपाई करण्यात येईल. दिनांक ३० डिसेंबर २०१६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने अर्हता दिनांकावर आधारित तीन वर्षांपूर्वी पदवी प्राप्त केलेल्या नागरिकांनी विहित नमुना क्रमांक १८ मध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतदार मदत केंद्रावर जमा करावा. नमुना क्रमांक १८ हा अर्ज तहसील कार्यालयामध्ये विनामुल्य उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे