‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा आढावा
·
दुर्गा उत्सवात
जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश
वाशिम, दि. १७ : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या सभेत
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा
आढावा घेतला. या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून स्त्रीभ्रूण हत्या रोखणे,
मुलींचे संगोपन व त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात व्यापक जनजगृती मोहीम
राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. याकारिता आगामी दुर्गा
उत्सव काळात विविध माध्यमांचा वापर करून प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यातील
मुलींच्या जन्मदरात वाढ होण्याकरिता स्त्रीभ्रूण हत्याविरोधी कायद्यांची प्रभावी
अंमलबजावणी होणे आवश्यक आहेच, पण त्यासोबत मुलींच्या जन्माविषयी लोकांच्या
मानसिकतेमध्ये सुध्दा बदल होणे आवश्यक आहे. याकरिता जाहिरात फलक, पोस्टर्स यासह
लोककलांच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच यामाध्यमातून लोकांना स्त्रीभ्रूण
हत्या विरोधी कायदा, मुलींना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या शैक्षणिक व इतर सवलती याविषयी माहिती देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी
द्विवेदी यांनी केल्या.
याप्रसंगी
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. नसिरुद्दीन पटेल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, सोनाली
ठाकूर आदी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीचे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान समितीचे सदस्य सचिव
योगेश जवादे यांनी अभियानविषयक माहितीचे सादरीकरण केले.
Comments
Post a Comment