विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते वाशिम तहसील कार्यालयातील ‘एटीडीएम’ कार्यान्वित



वाशिम, दि. २७ :  नागरिकांना कमी कालावधीत ऑनलाईन सातबारा व जुन्या अभिलेखांच्या प्रती मिळाव्यात, याकरिता आज अमरावती महसूल विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या हस्ते आज वाशिम तहसील कार्यालयात एनी टाईम डॉक्युमेंट्स मशीन (एटीडीएम-क्यू ऑस) कार्यान्वित करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, महसूल उपायुक्त प्रदीप पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी अभिषेक देशमुख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार बळवंत अरखराव आदी उपस्थित होते.

 एटीएम मशिन प्रमाणेच कार्यपध्दती असलेल्या या एटीडीएम मशिनमधून ऑनलाईन सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी पाच प्रकारच्या अभिलेखांच्या प्रती मिळविता येणार आहेत. या मशीनद्वारे जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील नागरिकांचे सातबारा, फेरफार, हक्क नोंदणी रजिस्टर, कोतवाल बुक नक्कल व पेरेपत्रक आदी अभिलेख उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हक्क नोंदणी रजिस्टर, पेरेपत्रक व सातबाराची प्रत मिळविण्याकरिता गट नंबर किंवा सर्व्हे नंबर माहित असणे आवश्यक आहे. त्याधारे आपल्याला आवश्यक सातबारा शोधून त्यांची प्रिंट घेता येईल. याचप्रमाणे गट नंबर, सर्व्हे नंबर किंवा फेरफार क्रमांक टाकून फेरफार अभिलेखाची प्रत मिळविता येईल. तसेच संबंधित वर्षाच्या माहितीद्वारे कोतवाल बुक नक्कल मिळविता येईल. अभिलेखाची एक प्रत मिळविण्यासाठी मशिनमध्ये फक्त २० रुपये रोख स्वरुपात जमा करावे लागतील. एका प्रतीस २० रुपये याप्रमाणे अभिलेखांच्या कितीही प्रती एका वेळेस काढता येतील. दि. १५ ऑगस्ट पासून जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांमध्ये ‘एटीडीएम’ कार्यान्वित करण्यात होणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर