वसंतराव नाईक शेती स्वावलंबन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी
वाशिम, दि. २८ : कै.
वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य
सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
एन. बी. पटेल. डॉ. अनिल कावरखे उपस्थित होते.
जिल्हा
सामान्य रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे शेतकरी, शेतमजूर व अत्यंत गरीब कुटुंबातील
असतात. त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
करण्याच्या सूचना श्री. तिवारी यांनी यावेळी दिल्या. त्यांनी रुग्णालयातील सर्जिकल
वॉर्ड, जनरल वॉर्ड, एसएनसीव्ही युनिट, ओपीडीला भेट देवून याठिकाणी पुरविल्या
जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. तसेच येथे उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांशी
संवाद साधून त्यांना रूग्णालयामार्फत देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती जाणून
घेतली.
Comments
Post a Comment