महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा शनिवारी वाशिम दौरा


वाशिम, दि. ३० :  राज्याच्या महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दि. २ डिसेंबर २०१७ रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

ना. पाटील हे दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता अकोला येथून वाशिमकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.३० वाजता त्यांचे वाशिम येथे आगमन होईल. याठिकाणी आयोजित नवीन शासकीय विश्रामगृह इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक होईल. त्यानंतर ना. पाटील हे वाशिम शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता ते वाहनाने यवतमाळकडे रवाना होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर