सोयाबीन अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात

·        ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांना मिळणार लाभ
·        १४ कोटी ७९ लक्ष रुपये अनुदानाचे होणार वितरण
वाशिम, दि. २४ : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या सोयाबीनला प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय दि. १० जानेवारी २०१७ रोजी घेण्यात आला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील पात्र ४४ हजार ६१८ लाभार्थ्यांना हे अनुदान वितरणास सुरुवात झाली असून अनुदानास पात्र शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम आपल्या खात्यात जमा झाल्याची खात्री करावी, असे जिल्हा उपनिबंधक सहकरी संस्था रमेश कटके यांनी कळविले आहे.
२०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे बाजारातील आवक वाढून दरात घसरण झाली होती. त्यामुळे १ ऑक्टोंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गत आडत व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे २५ क्विंटल मर्यादेपर्यंत अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या व अनुदानास पात्र ठरलेल्या ४४ हजार ६१८ शेतकऱ्यांना १४ कोटी ७९ लक्ष १३ हजार ५९४ रुपये रक्कमेचे वाटप करण्यात येणार आहे.
वाशिम कृषि उत्पन्न बाजार समितीमधील ९ हजार ५८८ शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लक्ष २१ हजार ७१२ रुपये, रिसोड कृषि उत्पन्न बाजार समितीमधील ६ हजार ९०७ शेतकर्यांना २ कोटी १३ लक्ष १८ हजार ७३४ रुपये, मालेगाव कृषि उत्पन्न बाजार समितीमधील ५ हजार ४४० शेतकऱ्यांना १ कोटी ८५ लक्ष ४६ हजार ३५४ रुपये, मंगरूळपीर कृषि उत्पन्न बाजार समितीमधील ९ हजार ४३६ शेतकऱ्यांना २ कोटी ६० लक्ष २१ हजार २७८ रुपये, कारंजा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील ११ हजार ३१९ शेतकऱ्यांना ४ कोटी ८७ लक्ष ४१ हजार ८३६ रुपये व मानोरा कृषि उत्पन्न बाजार समितीमधील १ हजार ९२८ शेतकऱ्यांना ५७ लक्ष ६३ हजार ६८० रुपये अनुदान वितरीत केले जाणार असल्याचे श्री. कटके यांनी कळविले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे