अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

वाशिम, दि. ०२ :  महाविद्यालयांची संख्या व तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात मर्यादा येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना भेजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: खर्च करून घ्याव्या लागतात. राज्य शासनाने अनूसुचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेत अनुसूचित जाती प्रवर्गातील शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेला विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे.
वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही वार्षिक रक्कम असणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका परीक्षेमध्ये किमान ६०  टक्के गुण असणे आवश्यक आहे. याच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट ५० टक्के आहे. 
            विद्यार्थी जर मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे, ठाणे, नागपूर याठिकाणी शिक्षण घेत असेल, तर भोजन भत्ता वार्षिक ३२ हजार, निवास भत्ता २० हजार व निर्वाह भत्ता ८ हजार असे एकूण ६० हजार रूपये विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात टाकण्यात येणार आहेत. तसेच महसूल विभागीय शहर, क वर्ग महानगरपालिका शहर यामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता वार्षिक २८०००, निवास भत्ता १५ हजार व निर्वाह भत्ता ८००० असे एकूण ५१ हजार रूपये खात्यात जमा केल्या जाणार आहे. तसेच उर्वरित ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता २५ हजार, निवास भत्ता १२ हजार व निर्वाह भत्ता ६ हजार असे एकूण ४३ हजार विद्यार्थ्यास मिळणार आहे. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष ५ हजार रूपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २ हजार रूपये रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी देण्यात येणार आहे. या योजनेच्या निकष, अटी अर्ज
 www.maharashtra.gov.in, www.sjsa.maharashtra.gov.in, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अर्ज डाऊनलोड करून भरावे लागणार आहे किंवा सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या कार्यालयातून विद्यार्थ्यांस उपलब्ध होणार आहे.

जिल्हानिहाय अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेवर निवड करण्यात येणार आहे. निवड यादी समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. अर्ज १५ नोव्हेंबर २०१७ पर्यंत समाज कल्याण कार्यालयास सादर करावे लागणार आहे. यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे