वाशिम येथे बुधवारपासून ‘ग्रंथोत्सव’चे आयोजन
·
दोन दिवस परिसंवाद,
काव्यवाचनसह विविध कार्यक्रम
·
एस. एम. सी. शिक्षण
संकुल येथे आयोजन
·
ग्रंथ प्रदर्शन व
विक्रीसाठी विविध स्टॉल
वाशिम, दि. २८ : महाराष्ट्र राज्य
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने
वाशिम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत दि. २९ व ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वाशिम
येथील एस. एम. सी. शिक्षण संकुलच्या स्व. सत्यनारायणजी जोशी सभागृह येथे ‘ग्रंथोत्सव
२०१७’ चे आयोजन करण्यात आले आहे. तरी
जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, नागरिकांनी ग्रंथोत्सवास उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रंथोत्सव
समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
ग्रंथोत्सवानिमित्त दि. २९
नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथदिंडी
आयोजित केली जाणार आहे. यावेळी नगराध्यक्ष अशोक हेडा, माजी आमदार अॅड. विजय जाधव, राजे
वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. व्य. रा. बावने, सावित्रीबाई फुले महिला
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, ग्रंथपाल प्रा. प्रज्ञा क्षीरसागर,
जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष रमेश काळे आदी उपस्थित राहणारे आहे.
ग्रंथोत्सव उद्घाटनाचा
कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता महसूल राज्यमंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड
यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री मदन येरावार,
गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार
भावना गवळी, खासदार संजय धोत्रे, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार श्रीकांत
देशपांडे, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी
राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस
अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, ज्येष्ठ गांधीवादी
विचारवंत हरिभाऊ क्षीरसागर यांच्यासह अमरावती येथील लेखिका तथा समाजसेविका रजिया
सुलताना, कादंबरीकार बाबाराव मुसळे आदी उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ३.३० वाजता ‘प्रभावी
वाचन माध्यमे’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. जिल्हा कारागृह अधीक्षक रामराजे
चांदणे हे परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत, तर साहित्यिक प्रा. धोंडूजा
इंगोले, प्रा. गजानन वाघ, प्रकाशक विठ्ठल जोशी, साहित्यिक डॉ. दीपक ढोले आदी
यामध्ये आपले विचार मांडणार आहेत.
दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी
११ वाजता ‘ग्रंथाने काय दिले’ या विषयावरील परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार सुभाष
हातोलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात ‘काव्याग्रह’चे प्रकाशक
विष्णू जोशी, शिक्षिका मीना मापारी, किरण गीऱ्हे, साहित्यिक भारत लादे आदी सहभागी
होणार आहेत. दुपारी ३ वाजता सेवानिवृत्त प्राचार्य कलीम खान यांच्या अध्यक्षतेखाली
काव्य वाचन व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शेषराव पिराजी धांडे,
चाफेश्वर गांगवे, चित्रकार रा. मु. पगार, महेंद्र ताजणे, डॉ. विजय काळे आदी सहभागी
होणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता ‘ग्रंथोत्सव’चा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात
आला आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली
होणार्या या कार्यक्रमास अमरावतीचे सहाय्यक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, जिल्हा
कोषागार अधिकारी एस. टी. गाभणे, डी. आय. ई. सी. पी डी.च्या प्राचार्य प्रतिभा
तायडे आदी उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील साहित्य प्रेमींनी या
ग्रंथोत्सावाला उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा समन्वय समितीने केले आहे.
भव्य ग्रंथ प्रदर्शन
व विक्री
दि. २९ नोव्हेंबर रोजी ग्रंथोत्सव
उद्घाटन कार्यक्रमानंतर याठिकाणीक ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या दालनानांचे
उद्घाटन होणार आहे. यामध्ये विविध प्रकाशन संस्था, नामांकित ग्रंथ विक्रेते यांची
दालने उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाने प्रकाशित केलेले स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय
उपयुक्त ‘महाराष्ट्र वार्षिकी’ संग्रह
ग्रंथ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित लेखसंग्रह
असलेल्या ‘महामानव’ ग्रंथाची विक्रीसाठी वाशिम जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने
याठिकाणी स्टॉल उभारण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment