वाशिम येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण


महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन



वाशिम, दि. ०१ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज येथील पोलिस कवायत मैदान येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, वाशिमचे नगराध्यक्ष अशोक हेडा, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी रमेश काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, सुदाम इस्कापे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्री श्री. राठोड यांनी परेड निरीक्षण केले. तसेच उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार तसेच सर्व नागरिकांना महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त व कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले.

यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या नेतृत्वात विविध पथकांचे संचलन झाले. यामध्ये पोलिस मुख्यालय येथील पुरुष पथक, महिला पोलिसांचे पथक, वाद्य पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचलन मोहन शिरसाट यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे