केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गाचे वाशिम येथे राष्ट्रार्पण....राष्ट्रीय महामार्ग 161 च्या 133 किमी च्या कामावर 3694 कोटी रुपये खर्च




केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय महामार्गाचे वाशिम येथे राष्ट्रार्पण

राष्ट्रीय महामार्ग 161 च्या 133 किमी च्या कामावर 3694 कोटी रुपये खर्च

        वाशिम, दि. 27 (जिमाका) : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता वाशीम येथील रिसोड मार्गावरील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथे आयोजित कार्यक्रमात तीन टप्प्यात पूर्ण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चा राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. मेडशी ते वारंगा फाटा दरम्यानच्या 133.85 किमीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यावर 3694 कोटी 51 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे.

          या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री संजय राठोड, हिंगोली पालकमंत्री अब्दूल सत्तार, खासदार भावना गवळी, खासदार संजय धोत्रे व खासदार हेमंत पाटील, विधान परिषद सदस्य आमदार सर्वश्री वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, ऍड.किरणराव सरनाईक, विप्लव बाजोरिया, विक्रम काळे, संतोष चव्हाण, विधानसभा सदस्य आमदार सर्वश्री लखन मलिक, अमित झनक, राजेंद्र पाटणी, रणधीर सावरकर, संतोष बांगर,नितीन देशमुख व हरीश पिंपळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. 

         श्री.गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात येणाऱ्या महामार्गामध्ये अकोला - मेडशी दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 हा 47.70.किमी लांबीचा असून यावर 1258 कोटी 51 लक्ष रुपये. मेडशी - वाशिम दरम्यानचा हाच राष्ट्रीय महामार्ग 44.50 किमी लांबीचा असून यावर 1394 कोटी रुपये आणि पांगरी ते वारंगा फाटा दरम्यानचा हाच राष्ट्रीय महामार्ग 41.65 किमीचा असून काँक्रिट रस्ता निर्मितीसाठी 1042 कोटी रुपये असा एकूण 133.85 किमीचा सिमेंट काँक्रिट राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी 3694 कोटी 51 लक्ष रुपये निधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर तीन टप्प्यात खर्च करण्यात आले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे