कोंडाळा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात
- Get link
- X
- Other Apps
कोंडाळा येथे
कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर उत्साहात
वाशिम, दि. 07 (जिमाका) : राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार 6 सप्टेंबर रोजी वाशिम तालुक्यातील कोंडाळा येथील कोंडेश्वर महादेव संस्थान या धार्मिक स्थळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विजयकुमार टेकवाणी होते. यावेळी मुख्य लोक अभिरक्षक अॅड.परमेश्वर शेळके यांनी महिलाविषयक कायदे, ज्येष्ठ नागरिक कायदा व बालकांच्या अधिकारांविषयी मार्गदर्शन केले.
वाशिमचे गटविकास अधिकारी श्री. खुळे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. सहायक लोक अभिरक्षक अॅड. शुभांगी खडसे यांनी शासकीय योजनांची माहिती दिली. सहायक लोक अभिरक्षक अॅड. हेमंत इंगोले यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ह.भ.प. श्री. भडदमकर महाराज यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ग्रामपंचायत कोंढाळा येथील बाळू देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment