24 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे विकास कामांची पायाभरणी


24 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे विकास कामांची पायाभरणी 

वाशिम दि.22 (जिमाका) पोहरादेवी - उमरी परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी विकास कामांचा प्रत्यक्ष पायाभरणी कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता संत सेवालाल महाराज मंदिर परिसर पोहरादेवी येथे होणार आहे. प्रत्यक्ष पायाभरणी धर्मगुरू बाबुसिंग महाराज व कबीरदास महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक विधानसभा उपसभापती तथा कर्नाटकच्या भायागड संस्थांनचे अध्यक्ष रुद्रप्पा लभाणी, तेलंगणाच्या महिला व बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड,कर्नाटक राज्यातील गुलबर्ग लोकसभा क्षेत्राचे खासदार उमेश जाधव व सत्कारमूर्ती माजी आमदार अनंतकुमार पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच यावेळी वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड, महंत सुनील महाराज,महंत जितेंद्र महाराज,महंत यशवंत महाराज,महंत राजयसिंग महाराज,महंत शेखर महाराज, आमदार सर्वश्री राजेंद्र पाटणी,निलय नाईक,राजेश राठोड इंद्रनिल नाईक,डॉ.तुषार राठोड, जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी खासदार शंकर पवार, माजी मंत्री अमरसिंग तीलावत, सेवागड संस्थांनचे अध्यक्ष जगन्नाथ राव, कर्नाटकचे माजी मंत्री प्रभू चव्हाण, श्री.रेऊ नाईक,डॉ.टी.सी.राठोड, किसन राठोड,मिलिंद पवार, पोहरादेवी सरपंच विनोद राठोड  
वसंतनगरचे सरपंच गणेश जाधव यांची देखील प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे.
                   राज्य शासनाने मंजूर केलेल्या पोहरादेवी - उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामांचे  भूमिपूजन 12 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.या विकास आराखड्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज मंदिराच्या प्रत्यक्ष पायाभरणीचा हा कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. 
              तसेच यावेळी बंजारा स्टार गायकांचा " संत सेवालाल स्वर यात्रा " हा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.यामध्ये बंजारा चित्रपट गायक नरेंद्र राठोड, के गणेशकुमार व आकाश चव्हाण, कलर्स टीव्ही मराठी फेम स्नेहल चव्हाण हे सहभागी होतील.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे