महाकृषी ऊर्जा अभियान योजना लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रृटी पुर्ण करा महाऊर्जाचे आवाहन




महाकृषी ऊर्जा अभियान योजना

लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्जातील त्रृटी पुर्ण करा

महाऊर्जाचे आवाहन

        वाशिम, दि. 13 (जिमाका) महाकृषी -ऊर्जा अभियान (पी.एम. कुसुम योजना घटक-ब) योजनेंतर्गत जिल्ह्यात शेतकऱ्यांचे एकुण २० हजार ६५७ अर्ज आजपर्यंत ऑनलाईन महाऊर्जाच्या कुसुम पोर्टलवर प्राप्त झाले आहे. या अर्जापैकी १८३५ लाभार्थी शेतकऱ्यांनी सौरपंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. एकुण २० हजार ६५७ लाभार्थी शेतकऱ्यांपैकी १४०५ लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळली असल्यामुळे त्यांचे अर्ज प्रलंबित यादीत आहे. या सर्व लाभार्थ्यांना कुसुम पोर्टलवरुन एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले आहे. यवतमाळ येथील जिल्हा कार्यालय, महाऊर्जा, यांच्याकडुन अशा सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची त्रूटी पुर्ण करण्याकरीता भ्रमणध्वनीव्दारे कळविण्यात आले आहे. तरी अद्यापपर्यंत लाभार्थ्यांनी त्रुटींची पुर्तता केलेली नाही.

            त्रुटी अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी महाऊर्जा, जिल्हा कार्यालय, यवतमाळ येथे कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक ०७२३२-२२४११५० यावर संपर्क करुन आपल्या अर्जामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या त्रुटींबाबत विचारणा करावी व प्राप्त मार्गदर्शनानुसार त्रूटी पूर्तता करुन घ्यावी किंवा शेतकऱ्यांना मिळालेल्या युजर नेम व पासवर्डचा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन कागदपत्रांची त्रुटी पूर्तता करावी. यासाठी महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/benef_home या संकेतस्थळाला भेट दयावी. जे लाभार्थी २४ सप्टेंबरपर्यंत त्रूटीची पूर्तता करणार नाही, त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील व मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा “प्रथम त्रूटी पूर्तता करणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या अनुषंगाने गणला जाईल. असे महाराष्ट्र राज्य विकास अभिकरणचे (महाऊर्जा) विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी कळविले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे