दाभडीच्या तांडा योजनेचा निधी यंत्रणेला वितरण नाही आश्रमशाळांवर नियमानुसारच कारवाई सहाय्यक आयुक्त वाठ यांची माहिती




दाभडीच्या तांडा योजनेचा निधी यंत्रणेला वितरण नाही

आश्रमशाळांवर नियमानुसारच कारवाई

सहाय्यक आयुक्त वाठ यांची माहिती

       वाशिम, दि. 05 (जिमाका) मंगरुळपीर तालुक्यातील दाभडी ग्रामपंचायत येथे तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत सदर कामासाठी निधी मंजूर झाला असून संबंधित यंत्रणेला या निधीचे वितरण करण्यात आलेला नाही. जिल्हयातील विमुक्त जाती भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळेच्या माध्यमातून पुरविण्यात येणाऱ्या भौतिक सुविधांचा अभाव व शासकीय नियमानुसार न चालणाऱ्या 5 आश्रमशाळांवर नियमानुसार कारवाई करुन प्रशासक नेमण्यात आल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.

          बृहत आराखडयामध्ये ग्राम दाभडी तांडा वस्तीची लोकसंख्या 250 दर्शविण्यात आली आहे. सन 2022-23 या वर्षात वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समिती सभेने मंगरुळपीर तालुक्यातील दाभडी येथे सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी 5 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे. या मंजूर कामाचा निधी संबंधित अंमलबजावणी यंत्रणेला अद्यापही वितरीत करण्यात आलेला नाही. मंजूर कामाबाबत संबंधित गटविकास अधिकारी व संबंधित गावच्या ग्रामपंचायतचे सचिव यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे तसेच या मंजूर कामांची स्थळ पाहणी करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थायी समिती सदस्य आर.के. राठोड यांनी उपस्थित केलेल्या मुद्दयाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे अनुपालन अहवाल सादर केला आहे.

           इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून विमुक्त जाती भटक्या जमाती आश्रमशाळा ही योजना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेमार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत शिक्षण घेणाऱ्या वि.जा.भ.ज.च्या विद्यार्थ्यांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदानातून सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची आहे. निवासी व अनिवासी विद्यार्थ्यांना नियमानुसार दर्जेदार गुणवत्तापुर्ण शिक्षण व इतर सोयी सुविधा पुरविण्याकरीता कळविण्यात आले आहे. जिल्हयातील वि.जा.भ.ज.च्या आश्रमशाळांची तपासणी करुन सोयी सुविधांचा अभाव दिसून आलेल्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नियमानुसार सोयी सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या व इतर गंभीर त्रृटी आढळून आलेल्या 5 वि.जा.भ.ज. आश्रमशाळेवर प्रशासकाची नेमणुक करण्यात आली आहे. एका संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय किंवा वि.जा.भ.ज. आश्रमशाळा संस्था चालक यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची मिलीभगत नसल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी दिली.              

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे