म्हसला (खुर्द) येथे जनावरांचे लसीकरण व जनजागृती
- Get link
- X
- Other Apps
म्हसला (खुर्द) येथे जनावरांचे लसीकरण व जनजागृती
वाशिम, दि. 13 (जिमाका) : मालेगाव तालुक्यातील म्हसला (खुर्द) येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे आज १३ सप्टेंबर रोजी चर्म रोगाला प्रतिबंध करण्यासाठी गोवंशीय पशूंचे लसीकरण पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनिता सोळंके यांनी केले. यावेळी गावातील पशुपालकांनी लसीकरणासाठी आपली गोवंशीय जनावरे आणली होती. सरपंच अनिल जोगदंड, भास्कर धनगर, पट्टीबंधक कांबळे, अभिषेक नवघरे, मारुती मांजरे ज्ञानेश्वर जोगदंड शालिग्राम कंकाळ, संदीप खडसे व प्रकाश धोंगडे उपस्थित होते. जनावरांना जंतनाशक औषधी तसेच गोठ्याच्या स्वच्छतेबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करून पशुपालकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment